चेराठी जंगलातील हातभट्ट्या उध्वस्त

| नागोठणे । वार्ताहर ।

नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई लगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या तीन हातभट्टी नागोठणे पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत. पो. नि. राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे अंमलदार व पथकाने शनिवारी (दि.20) सकाळी 8 वा.च्या सुमारास धाड टाकून अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूच्या तीन हातभट्ट्या उध्वस्त करुन 27 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.

या धाडीत चार पत्राच्या टाक्यांमध्ये प्रत्येकी 100 लिटर असे 400 लिटर गूळमिश्रित रसायन, तसेच तीन प्लास्टिकच्या ड्रममध्ये प्रत्येकी 50 लिटर असे एकूण गूळमिश्रित 150 लिटर रसायन असे एकूण 550 लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट करून पेटवून देण्यात आला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश जगताप, नितीन गायकवाड, गंगाराम डुमणे, अशिष पाटील, सत्यवान पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Exit mobile version