| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग शहरात हातमाग कपडचे प्रदर्शन व विक्रीला अलिबागकरांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी यावेळेस भरपूर नवनवीन प्रकार उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्याचा अलिबागकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाऊराय हॅण्डलुम सोलापुर यांचे हातमाग कापड प्रसिद्धी व विक्री कार्यक्रमांतर्गत हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. दि. 30 मेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. स्थळ सार्वजनिक वाचनालय, डोंगरे हॉल, रायगड जिल्हा परिषदेजवळ मुख्य पोस्ट ऑफिससमोर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन म्हणाले की यांत्रिक युगामध्ये स्पर्धा करीत सर्व समस्यांशी सामना करून त्यांचे पिढीजात पारंपरिक हातमागावर समृद्धीचे वस्त्र विणण्याचे आणि वस्त्र संस्कृतीच्या अमूल्य ठेवा जोपासण्याचे काम आपले विणकर अविरतपणे काम करीत आहे. त्यांच्या या गतिशील प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी तयार केलेल्या हातमाग कापडाला योग्य बाजारपेठ मिळावी त्याकरिता हातमाग वस्त्रोद्योगमध्ये काम करणार्या संस्थांचे योगदान मिळून बळकटीकरण व सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
या प्रदर्शनास अलिबागकरांनी देऊन विणकर कामगारांच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुती व खादी कापडाच्या विक्रीवर 20 टक्के सूट ठेवण्यात आली असून, दि. 30 मेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.