श्री हनुमान जन्मोत्सव संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी विधीवत पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुतेक ठिकाणी मंदिरात सकाळपासून भविकांना गर्दी केली होती.
भालगावात 200 वा जन्मोत्सव
| कोर्लई । वार्ताहर ।
रोहा-मुरुड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भालगावमध्ये काळबेरे कुटुंबियांचे जागेत वडिलोपार्जित असणार्या श्रीहनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा पंचक्रोशीतील ग्रामस्थाच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हे मंदिर सुमारे 200 वर्षा पासूनचे असून हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा रघुनाथ काळबेरे यांनी आपल्या घराशेजारी स्वत:च्या मालकी जागेत केलेली आहे. त्यानंतर कै. महादेव काळबेरे यांनी परंपरा सांभाळली आणि आम्ही आणि आमची मुले पुढे हा वारसा सांभाळत असल्याची माहिती नंदकुमार काळबेरे, अनिल काळबेरे यांनी दिली. हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालगाव ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कर्जतमध्ये विविध कार्यक्रम
| नेरळ । वार्ताहर ।
श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावोगावी असलेल्या मारुती मंदिर भक्तांनी गजबजली होती. कर्जत शहरात उत्सव साजरा होत असून कशेले येथे यात्रा आणि हरिनाम सप्ताह आयोजित होत आहेत.

नेरळ येथील मंदिरात पूजेचे आणि प्रवचन तसेच अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तालुक्यात खांडस या मोठ्या लोकवस्तीच्या गावात देखील हनुमान जयंती उत्साहात साजरी केली गेली. तर नेरळ कळंब रस्त्यावरील पोशीर गावात हनुमान जयंती निमित्त यात्रा भरली होती. तसेच या गावातील श्री हनुमानाची मिरवणुक रात्रभर फिरत असते आणि शेवट पर्यंत शेकडो भक्त गर्दी करून साथ देत असतात. माथेरान शहरात श्रीराम चौकात असलेल्या मंदिरात हनुमान जयंती निमित्त पालखी सोहळा आणि गुढी पाडव्याला सुरू झालेल्या वसंत उत्सवाचा समारोप हनुमान जयंतीला झाला.
उरणमध्ये विधिपूर्वक पूजा अर्चा
| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील पागोटे, मोठे भोम, दिघोडे, वेश्वी, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, करंजा तसेच उरण शहरातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षांची धार्मिक परंपरा जोपासत विधिपूर्वक पुजा अर्चा करून श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री हनुमान मंदीरात भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी उत्सव कमिटीच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने गुरुवारी (दि.6) रोजी पहाटे श्री हनुमंताचा अभिषेक, कलश पुजन, पुजा अर्चा, अध्याय वाचन, आरती, भजन, कीर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तेलवडे कीर्तनाचे आयोजन
| कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील तेलवडे या गावातील मंदिरात गुरुवारी पहाटे श्री हनुमान जन्मकाळ सोहळा तेलवडे, मुरूड, शिघ्रे, लक्ष्मीखार येथील शेकडो ग्रामस्थ भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा येथील सुषमा भावे यांचे हनुमान चरित्रावर पहाटे सुश्राव्य किर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. तेलवडे ग्रामस्थांनी या 123 व्या सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्ताने गावातून पालखी काढण्यात आली तसेच यात्रेचे आयोजन देखील करण्यात आले.

पनवेलच्या पंचमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

पनवेलच्या सोमटने येथे श्री हनुमान मंदिरात भविकानी दर्शन घेऊन पूजा केली
मोठेभोम येथे भक्तांची मांदियाळी
| चिरनेर । वार्ताहर ।
मोठेभोम गावात भक्तांच्या श्रद्धेला साद देणार्या देवस्थानातील श्री हनुमंताचा जयंती सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी मोठेभोम पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री हनुमान दर्शन घेतले.

तीन दिवस चालणार्या या उत्सवात हसुराम बाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या हरिपाठाचा कार्यक्रम झाला. तर श्री हनुमंताच्या जन्मदिनी कीर्तनकार गणेश गोविंद गाडगीळ यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन पार पडले. त्यानंतर संतकृपा प्रासादिक महिला भजन मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला.
कुडतुडीत ग्रामस्थांचा सहभाग
| म्हसळा । वार्ताहर ।
कुडतुडी ग्राम सुधारणा मंडळ मुंबई आणि स्थानिक यांच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हळदीकुंकू, भजन, पालखी मिरवणूक अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मंगेश चाळके, दिनकर चाळके, सुप्रिया महामूनकर, विजय चाळके, राजेश चाळके, प्रियांका चाळके, सुधाकर चाळके, सुरेंद्र चाळके, स्वेता चाळके, नितीन दळवी, द्वारकानाथ दळवी, हरिछंद्र चाळके, मंगेश साळी, प्रदिप कदम, भालचंद्र दातार, प्रमोद कळस, सचिन करंबे, अमोल शिगवण आदि मान्यवर उपस्थित होते.
कामोठेत हनुमान जयंती साजरी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत कामोठे येथे कामोठे रहिवाशी सार्वजनिक सांप्रदाय सेवा मंडळाच्या वतीने विठ्ठल रुखुमाई मंदिर सेक्टर 09 कामोठे या ठिकाणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक शंकर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात पार पाडला.

या प्रसंगी कीर्तनकार शालिनी सत्रे यांचे सुस्वर भजन झाले. या उत्सवाला विठ्ठल रुखुमाई भजन मंडळाचे घनश्याम शेटे, गंगाराम चौगुले महाराज, राजेंद्र पाटील, रामदास एरंडे, नामदेव विधाते, नामदेव माने, यशवंत जाधव, धोंडे ताई, नंदा जाधव, जनाबाई चव्हाण, केराबाई होळंबे, संगीता पाटील, गीता उंडे, शुभांगी कड, हरिषचंद्र पाटील, किसन म्हात्रे, लक्ष्मण सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरुडमध्ये अभिषेक
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुडमध्ये श्री भैरव विठ्ठल रखुमाई देवस्थान जुनी पेठ येथील मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.

यावेळी अध्यक्ष विश्वास चव्हाण, प्रकाश चव्हाण, अनंत म्हसळकर, रुपेश जामकर, ओमकार पोतदार, प्रकाश राजपुरकर, संतोष नाईक, रुपेश राजपुरकर, दिपक राजपुरकर, अच्युत पोतदार, अत्रे, कोतवाल आदिंसह मान्यवर उत्सव साजरा करण्याकरिता उपस्थित होते. शहरातील पंचक्रोशीत भागातील तेलवडे, खारअंबोली, शिघ्रे येथील मारुतीरायाच्या जन्मोत्सवानिमित्य यात्रा उत्सवाचे आयोजन केले होते.