नागोठण्यात हनुमान जन्मोत्सव साजरा

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे शहरातील आंगर आळीतील, के. एम. जी. विभागातील तसेच नागोठणे परिसरातील सर्वच हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त सर्वत्र पालखी सोहळे आयोजित करण्यात आले होते. नागोठण्यातील आंगर आळीतील हनुमान मंदिरातील जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात मंदिरात सकाळी 7 वाजता अभिषेक व पूजा करून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता वाजत हा पालखी सोहळा सुरू करण्यात आला. त्यानंतर आंगर आळीत सर्वत्र ही पालखी फिरविण्यात आली. या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांसह, अबाल वृद्ध, माहेरवाशिणी व तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. पालखी आपल्या घरासमोर येणार असल्याने महिलांनी सर्वत्र रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच, सर्वत्र आकर्षक सजावट करण्यात आली होती. नंतर हा पालखी सोहळा आंगर आळीतील श्री हनुमान मंदिरात रात्री 10 वाजता पोचल्यानंतर महाआरती घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Exit mobile version