पनवेल-रसायनी मार्गावरील आपटा येथील रस्त्यावर असलेले हनुमानाचे भव्य मूर्तीरूपे मंदीर येथे श्री हनुमान जयंती निमित्त सकाळपासून भक्तांनी दर्शनाकरीता गर्दी केली होती.

श्री हनुमान जयंती निमित्त पनवेलच्या सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनाकरीता सकाळपासून रांगा लावल्या होत्या. तसेच, भक्तांकरीता महाप्रसाद ठेवला होता.

खांदा वसाहतीच्या श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासून भक्तांनी दर्शनाकरीता रांगा लावल्या होत्या.

हनुमान जयंती निमित्त अलिबाग मधील चेंढरे येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
