महाड | प्रतिनिधी |
महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर कामगार उत्कर्ष सभा या मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या रिक्त झालल्या उपाध्यक्षपदाच्या जागेवर काँग्रेसचे युवा नेते हनुमंत तथा नानासाहेब जगताप यांची नुकतीच निवड करण्यांत आली आहे. कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी नानासाहेब जगताप यांना या पदाचे नियुक्ती पत्र दिले. माणिकराव जगताप यांनी कामगार क्षेत्रांत दिलेल्या योगदानाचा आदर्श समोर ठेऊन या पदाला आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करु अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
माणिक जगताप हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पेक्षा अधिक काळ कामगार उत्कषर्र् सभेच्या माध्यमांतून औद्योगिक वसाहती मधील कामगारांना प्याय देण्याचे काम केले असुन व्यवस्थापना कडून कामगारांच्या न्याय मागण्या मान्य करुन घेण्याचे काम प्रभावी पणे केले. त्यांच्या अनपेक्षित निधनाने रिक्त झालेल्या संघटनेच्या पदावर हनुमंत जगताप यांची नियुक्ती करण्याचा निर्णय कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेद्र जोशी घेतला आणि जगताप यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी समारंभामध्ये नियुक्तीचे पत्र जोशी यांनी जगताप यांच्या कडे सुपूर्द केले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहल जगताप,विद्यार्थी प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस श्रीयश जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
माणिकराव जगताप यांची उणीव भरुन निघणारी नसली तरी हनुमंत जगताप त्याच पध्दतीने आणि तडफेने कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करतील
जितेंद्र जोशी,अध्यक्ष कामगार संघटना