। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद शाळेत हरणटोळ जातीचा साप शिरला होता. येथील सर्पमित्र अमर पाल व चांद शेख यांनी त्याला पकडून एका प्लास्टिकच्या बरणीत ठेवले. त्यानंतर या सापाने तब्बल 6 पिल्लांना बरणीतच जन्म दिला. काही वेळाने वनविभाग व सर्पमित्रांच्या मदतीने हरणटोळ व तिच्या 6 पिल्लांना वनविभागाचे कर्मचारी मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप जंगलात नेऊन सोडले.