सोलापूरच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
| नेरळ | वार्ताहर |
माथेरान येथील तरुणीचा 2015 मध्ये सोलापूर येथील तरुणांबरोबर विवाह झाला होता. मात्र लग्नाला सहा वर्षे झाली तरीदेखील मुलं होत नाही म्हणून माथेरान मधील त्या तरुणीचा छळ गेली पाच वर्षे छळ सुरु होता. त्यानंतर सहा लाख रुपयांची मागणी करून ते पैसे आणण्यासाठी सोलापर येथून माथेरानला आणून सोडणार्या सासरच्या मंडळीने त्यांना पुन्हा घरी नेले नाही. त्यामुळे माथेरान पोलीस ठाणे येथे त्या विवाहित तरुणीच्या तक्रारीनंतर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे.
माथेरान येथील कोतवाल नगर येथे राहणार्या प्रीती कुणाल घोडके यांचे 2015 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सूर्यनगर येथील तरुण कुणाल कमलनाथ घोडके या तरुणांबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी सोलापूर येथे राहणारी प्रीती हीच लग्नाला एक वर्षे झाल्यापासून छळ सुरु झाला. लग्नानंतर मुलं होत नाही म्हणून सदर विवाहित तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सासरची मंडळी करीत होती. नवरा कुणाल तसेच सासू कांचन कमलनाथ घोडके,सासरे कमलनाथ काशिनाथ घोडके, नणंद कांता प्रशांत गाढवे,नणंदा प्रशांत विठ्ठल गाढवे यांच्याकडून सतत छळ सुरु होता. सहा वर्षे छळ करून झाल्यावर प्रीतीच्या कुटुंबाने सहा लाख रुपये द्यावेत यासाठी आर्थिक छळ सुरु झाला. त्याच काळात कुणालने डॉ वैशाली देशमुख यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर सासरच्या मंडळीने प्रीतीला माथेरान येथे घरी सहा लाख रुपये आणण्यासाठी पाठवून दिले. मात्र लॉकडॉउनमध्ये माथेरानमधील व्यवसाय ठप्प होते आणि त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने प्रीतीच्या माहेरच्या मंडळीने प्रयत्न करून देखील होत नसल्याने संसाराची मंडळी सोलापूर येथे नापास तयार नव्हती.
त्यामुळे अखेर प्रीती कुणाल घोडके वय 31 यांनी माथेरान पोलीस ठाणे येथे आपल्या नवर्यासह सासू,सासरे,नणंद,नणंदा आणि नवर्याची दुसरी पत्नी असा सहा लोकांनी माथेरान येथून माहेरून सहा लाख रुपये आणण्यासाठी आणि मुलं होत नाही म्हणून छळ केल्याची तक्रार नोंद केली. त्यावेळी माथेरान पोलिसांनी प्रीती कुणाल घोडके यांचा हुंड्यासाठी आणि मुलं होत नाही म्हणून छळ केल्याबद्दल हुंडाबळीच्या गुन्हा नवरा कुणाला कमलनाथ घोडके तसेच सासू कांचन कमलनाथ घोडके,सासरे कमलनाथ घोडक ,नणंद कांता गाढवे ,नणंदा प्रशांत गाढवे आणि दुसरी पत्नी डॉ. वैशाली देशमुख असा सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे यांच्या मागर्दशनाखाली पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे अधिक तपास करीत आहेत. सध्या हि विवाहित तरुणी आपली माहेरी माथेरान येथे राहत आहे.







