विवाहितेचा पैशांसाठी छळ

| म्हसळा | वार्ताहर |

निगडी येथे विवाहितेचा पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत 2 जून 2021 रोजी निगडी येथे ही घटना घडली आहे.

पीडित महिलेला व आरोपीत हे नात्याने पती-पत्नी असून दुसरा आरोपीत ही फिर्यादी यांची सासु आहे. सासू – पतीने पीडित महिलेला लग्न झालेपासुन पैशाकरीता शारीरिक मानसिक त्रास देवुन मारहाण करून पीडित महिलेला माहेरून पैसे घेवुन येण्यासाठी दबाव टाकत होते. पीडित महिलेच्या पतीने पीडित महिलेला माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर मी तुला सोडुन देईल अशी दमदाटी केली. याबाबत म्हसळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह राहुल मुनेश्वर हे करीत आहेत.

Exit mobile version