। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाणे हद्दीमधील रिस येथील साईराम सोसायटी बिल्डींग येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला अमानूष वागणूक करत छळ केल्याची घटना घडली. विवाहितेचा पती सुनित घोडे, सासरे शंकरराव घोडे (70), सासू माया शंकर घोडे (62), नणंद सुप्रिता मुळगाव कोपगाव, जिल्हा अहमदनगर, सध्या राहणार रिस यांनी पीडित विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ करत क्रूरतेने वागणूक दिली. याबद्दल विवाहित महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







