हार्दिक अजून ‘दुख:ग्रस्त’ च

| नवी दिल्ली |

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकण्याचा दाट शक्यता आहे. तो अजूनही घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. मात्र तो आयपीएलपूर्वी तंदुरुस्त होईल असं सांगितलं जात आहे. हार्दिक पांड्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये खेळला होता. त्याने चार सामन्यात 5 फलंदाज बाद केले होते. मात्र 19 ऑक्टोबरला झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात चेंडू अडवताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित विश्वचषकाला मुकला होता. तेव्हापासून हार्दिक पांड्या कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो 5 टी 20 सामन्यांच्यी ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका देखील मुकला होता. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील तो खेळला नाही.

Exit mobile version