मुंबईसाठी हार्दिक पांड्या अपयशी

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएल 2024 च्या या हंगामात मुंबई इंडियन्स काही मोठ्या बदलांसह मैदानात उतरला होता. मुंबईने रोहित शर्माच्या जागी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा पहिला हंगाम खूपच खराब गेला. त्याचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. याआधी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे 2 हंगाम कर्णधारपद भूषवले होते आणि दोन्ही वेळा संघाला अंतिम फेरीत नेले होते. एकदा संघाला चॅम्पियन बनवण्यातही तो यशस्वी झाला होता.

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघ पहिल्यांदाच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची ही दुसरी वेळ आहे. यासह हार्दिक पांड्या हा मुंबईचा दुसरा कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. तर, 2022 च्या सुरुवातीला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ प्रथमच प्लेऑफमधून बाहेर पडला होता.सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ नवव्या स्थानावर आहे. फक्त गुजरात टायटन्स संघ त्याखाली आहे. त्याने 11 सामन्यांत 4 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत.

Exit mobile version