। गुजरात । वृत्तसंस्था ।
गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन जाता-जाता ट्विटर अकांऊंटवरून ट्विट करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ऐन निवडणूकांच्यावेळी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने आता ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.