उमरोलीत हरिनाम सोहळ्याचे आयोजन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत उमरोली यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम यज्ञ सोहळ्याचे आयोजन 26 व 27 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सुरुवातीला देवता पूजन झाल्यावर ग्रामस्थ मंडळाने चक्री भजन व गाव प्रदक्षिणा काढण्यात आली. सायंकाळी सामुदायिक हरिपाठ व दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवराम तुपे, मनोहर थोरवे तसेच मान्यवर उपस्थित होते.

दीड दिवसांच्या हरिनाम सोहळ्यास बुलढाणा येथील पुरुषोत्तम पाटील यांनी हरिकिर्तन केले तर ग्रामपंचायतमधील वारकर्‍यांनी जागर भजन केले. शनिवारी (दि.27) काल्याचे कीर्तन पुणे येथील केशव उखळीकर यांनी केले. उमरोली येथील सोहळ्यात उमरोली, कोशाने, वावे, डीकसल, गारपोली, आशाणे आदी गावातील ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे सोहळा यशस्वी झाला.

Exit mobile version