श्रीरामजन्मानिमित्त हरिनाम सप्ताह

| श्रीवर्धन | वार्ताहर |
सालाबादप्रमाणे श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीराम मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून मोठ्या भक्तिभावाने 46 वा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. यानिमित्ताने पहाटेपासून सामुदायिक पूजा व हरिपाठ, काकड आरती व भजन, ज्ञानेश्‍वरी पारायण, भागवतावर प्रवचन, जप आणि रात्री 9.30 ते 11.30 पर्यंत जाहीर हरि कीर्तन व त्यानंतर जागर अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कीर्तन सेवेमध्ये स्थानिक कीर्तनकारांप्रमाणेच मावळ (जि.पुणे), माझेरी (ता. महाड), रोहा (रायगड), मालेगाव इ. ठिकाणच्या कीर्तनकारांची कीर्तने होणार असून, दि. 30 रोजी रामनवमीचे दिवशी स.भ.प.पुरुषोत्तमदादा महाराज पाटील (आनंदी देवाची) यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन स.10 ते 12 या वेळात होणार आहे. त्याच दिवशी दु.12 ते 3 या वेळात महाप्रसाद होईल.

उत्सव काळात प्रवचन सेवेमध्ये दररोज स्थानिक व तालुक्यातील प्रवचनकारांची प्रवचने, तर जागर सेवेमध्ये स्थानिक व तालुक्यातील भजनी मंडळांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. श्री रामनवमीच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. तसेच सायं. 4 वा. होणारा संत वाङ्मयाचा व श्रीरामप्रभूंचा पालखी सोहळा उत्तम भक्तीभावाचे प्रतिक व प्रेक्षणीय असतो

Exit mobile version