| कोलाड । वार्ताहर
महादेववाडी येथे गुरुवार दि.30 मार्च ते रविवार दि.2 एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे. गेली 60 वर्षाची अखंड यशश्वि परंपरा राखत महादेववाडी येथे होणारा धार्मिक व अध्यात्मिक भक्तिमय सोहळा महादेववाडी गावानी जतन करुन ठेवला असून दररोज पहाटे काकड्याचे भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, प्रवचन, हरिपाठ, किर्तन व नंतर हरिजागरण होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नथुराम बाईत, धोंडू चितळकर, चंद्रकांत भऊर, शांताराम बाईत, पांडुरंग बाईत, तसेच ग्रामस्थ मंडळ, श्रीराम मित्रमंडळ, नवतरुण युवक मंडळ, महिला मंडळ महादेववाडी मेहनत घेत आहेत.