| खांब-रोहा | वार्ताहर |
गौरी-गणपतीच्या सणामध्ये गौरी पूजनासाठी आवश्यक असणाऱ्या सुप आणि सुपल्यांना सध्या मोठी मागणी असून ठिकठिकाणी सुप विक्रेते सुप आणि सुपल्या विकत असल्याचे दिसून येत आहेत.
एरव्ही घरगुती कामामध्ये व शेतीच्या कामामध्ये सुपांचा वापर केला जात असल्याने ग्रामीण जीवनामध्ये सुपांना अनन्यसाधारण महत्व आहे. तर गौरी-गणपतीच्या सणाला महिला, बालिकाांना गौरी पुजनासाठी सुपाची आवश्यकता असते. तर या दिवसात नववधू आपल्या माहेरहून विविध फळे, सुका मेवा, तसेच अन्य पदार्थांनी सुपं भरून सासरच्या घरी तसेच सासरकडील आप्तस्वकीय यांना भेट म्हणून देण्याची परंपरागत प्रथा आहे. गौरींना पुजनासाठी सुप आणि सुपल्यांची आवश्यकता असल्याने सध्या सुप विक्रेते व्यावसायिक व विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या बाजारात काही जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झालेली दिसत आहे. तर सुपांच्या किंमतीही 150 ते 200 रू पर्यंत पोहोचल्या आहेत.