| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. हरियाणा राज्यात 5 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये 3 टप्प्यात झाले. यानंतर आता या दोन्ही निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहे. या निकालासाठी मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.