हाशिवरे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

हाशिवरे हितवर्धक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वैजाळी इंग्रजी माध्यम व वैजाळी प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरूवारी (दि.25) पार पडला. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा साहित्यिक डॉ. संजीव म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच, दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.26) अश्विनी मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच, चित्रकला रांगोळी प्रदर्शन, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अशा विविध कलागुणांनी परिपूर्ण सोहळा देखील पार पडला.

वरील दोन्ही दिवसांचे सूत्रसंचालन अर्चना पुरो व वर्षा नाईक यांनी केले. तसेच, बी.जी. शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. हा विविध कार्यक्रम सोहळा मुख्याध्यापक बी.डी. गायकवाड, प्राथमिक विभाग ऋतुजा पाटील, प्रज्ञा धसाडे, प्रतिभा म्हात्रे, पर्यवेक्षक एन.डी. प्रबळकर, संकुलातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियोजनातून संपन्न झाला. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मंत्रालयाचे सहाय्यक नगर रचनाकार पियुष घरत हे होते. यावेळी हाशिवरे संस्थेचे उपाध्यक्ष सरोज डाकी, सचिव अनिल मोकल, सल्लागार सुबोध मोकल, खजिनदार ॲड. शैलेश मोकल, सदस्य निशिकांत मोकल, मालती मोकल, मिलिंद मोकल, द.र. मोकल गुरुजी व कृष्णा पाटील उपस्थित होते.

Exit mobile version