शिक्षकाची तडकाफडकी बदली

। नाशिक । वृत्तसंस्था ।

सिन्नर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथे एका शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. अशोक कचरे असे या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या बदली विरोधात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाणारा रस्त्या अडवला असून संस्थेने शिक्षकाची बदली का केली? याबाबत जाब विचारण्यासाठी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.

Exit mobile version