पक्षाने नगराध्यक्ष उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करणार

| चिपळूण । प्रतिनिधी ।
काँग्रेस पक्षाने आपणास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिल्यास सर्व ताकद पणाला लावून संधीचे सोने करेन असे माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांनी वार्तालाप करताना सांगितले आहे.आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेसचे काम करत आलो असून पक्षाच्या माध्यमातून सदैव कार्यरत आहे.महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने पक्ष ताकद बघूनच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

नगरपालिकेत तीन टर्म जनतेचा सेवक म्हणून आपणास अनुभव असून या अनुभवाच्या जोरावर चिपळूणचा कायापालट करण्याची एक संधी मिळण्याची आवश्यकता आहे.ह्या निवडणुकीनंतर आपण कोणतीही निवडणूक लढविणार नाही. शहरातील प्रत्येक नागरिकाला भेडसावणारा ब्लु-रेड लाईनचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी जीवाचं नाव शिवा ठेवू पण हा प्रश्‍न सोडविणार असा आत्मविश्‍वास शिंदे यांनी बोलुन दाखविला.2006 सालीच आपण विशीष्टी नदीकिनारी 20 फुटाची संरक्षण भिंत बांधण्याची मागणी लावून धरली होती.या अशा अनेक समस्या निकालात काढण्याचा मानस शिंदे यांनी बोलून दाखविला आहे.

Exit mobile version