। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील गेल्या 37 वर्ष 5 महिने यशस्वीपणे सेवा देणारे मुख्याध्यापक केशव जयराम गावंड यांचा गुरुवारी (दि.21) सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांना शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र प्रमुख संगीता चंदने यांच्या हस्ते सेवा निवृत्त मुख्याध्यापक केशव गावंड व पत्नी कल्पना गावंड यांचा यथोचित सत्कार आणि गौरव करुन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश चंदने, गोंधळीसर, बा.ज. म्हात्रे, उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकुर, हितेंद्र म्हात्रे, प्रशांत कोळी. चंद्रकांत गावंड आदीसह ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.







