मनोज म्हसे मुख्याधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण

| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वारे या गावात शेतकरी कुंटूबात जन्मलेला मनोज म्हसे मुख्याधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्याचे प्राथमिक शिक्षण मुळ गावी म्हणजे वारे या एक खेडे गावात पुर्ण केले शिक्षणाची इच्छा असलेल्या मनोज ने जिद्दीच्या जोरावर बीएससी अग्रिकलचर पदवी घेतली. यानंतर त्यांनी कर्जत नगरपालिकेत 2004 साली कामावरून रूजू झाले. त्यांनी अल्पावधीतच नगरपालिकेत सर्वांना आपले केले. 2013 साली मनोज खोपोली येथे बदली झाली, त्यानंतर खालापुर, बदलापूर येथे बदली झाली उद्यान, प्रवेशक कर, निरीक्षक मालमत्ता व्यवस्थापक अशा विविध पदावर त्यांनी काम केले. अलिकडेच शासनाने दहा टक्के पदांसाठी परिक्षा घेऊन पदोन्नती परिक्षा घेऊन नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी यांना पनोदीद्वारे मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरवले या संधीचे सोने करण्याचे त्यांनी ठरवले संचालक तथा आयुक्त नगपालिका प्रशासन मुंबई यांनी विभागीय परिक्षा घेतलेल्या परिक्षेत घवघवीत यक्ष संपादन करून त्यात मनोज ने 9 क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला.

Exit mobile version