आदर्श महाविद्यालयात आरोग्य शिबीर

| बोर्ली पंचतन | वार्ताहर |

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात बुधवार दि.27 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजिले होते .केंद्र शासनाच्या आयुष्मान भव या योजनेअंतर्गत उपजिल्हा रूग्णालय, श्रीवर्धन यांच्या सहकार्यामुळे सिकलसेल व आयुष्मान कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला. उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धनच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता गोरे याच्या मार्गदर्शन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिकलसेल आजाराबाबातचे मार्गदर्शन उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धनचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.महाजन व श्री. डाकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया दिवेकर हिने केले तर सहा.प्राध्यापक तृप्ती विचारे यांनी प्रास्ताविक केले तर अनिल वाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

Exit mobile version