| पनवेल | प्रतिनिधी |
पेंधर येथील सार्वजनिक नवरात्री उत्सवामध्ये रविवार दि.22 रोजी स्व. रोहित दादा स्मृती हॉस्पिटल यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पेंधर येथे सुमारे दीडशे रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये रुग्णांची इसीजी,रक्त तपासणी, आणि सामान्य तपासणी करण्यात आली.
डॉ. राहुल भोईर यांनी आयोजित केलेल्या या शिबिरास माजी आ. बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवा मडवी, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, डॉ. संतोष जगे, डॉ. वैभव कोपरकर, डॉ. सौ कामिनी राहुल भोईर आदी मान्यवरांनी या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
स्वर्गीय रोहित दादा प्रतिष्ठान व आई गावदेवी मित्र मंडळ पेंधर यांच्या यांच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्री उत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच दररोज संध्याकाळी भजनाचे कार्यक्रम राबवले गेले. या नवरात्र उत्सवासाठी पेंधर गावचे माजी सरपंच नितीन भोईर, एडवोकेट अविनाश भोईर, सागर पाटील (अध्यक्ष स्वर्गीय रोहित दादा प्रतिष्ठान ) आणि प्रथमेश भोईर. ज्यांनी विशेष मेहनत घेऊन हा नवरात्र उत्सव पार पाडला.