| अलिबाग । वार्ताहर ।
देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अलिबाग व लायन्य क्लब, अलिबाग याचे संयुक्त विद्यमाने आयोजित व लायन्स हेल्थ फाऊंडेशन व समता फाऊंडेशन, मुंबई यांचे सहकार्याने मोफत नेत्र चिकीत्सा व मधुमेह तपासणी शिबीर डोगरे हॉल, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग येथे घेण्यात आले. सदर शिबीराला प्रमुख पाहूणे म्हणून सार्वजनिक वाचनालय, अलिबागच्या कार्याध्यक्षा शैला प्रमोद पाटील, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष अविनाश राऊळ, लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर शुभदा कुडतरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर शिबाराचा 100 हून अधिक नागरीकांनी लाभ घेतला.