न्यू कट्टा मंडळातर्फे आरोग्य शिबीर

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील न्यू कट्टा मित्र मंडळ सहाणगोठीतर्फे शुक्रवारी (दि. 6 मे) प्रथमिक शाळा सहाणगोठी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात नामवंत व तज्ञ डॉक्टरांकडून पोटाचे विकार, सांध्याचे विकार, हद्यरोग, आम्पपित्त, मणक्यांचे आजार, श्‍वसनाचे विकार, आमवात, मुत्राशयाचे विकार, सर्दी, ताप, खोकला, किडनीचे विकार, त्वचारोग, गर्भाशयाचे आजार, स्त्रीयांचे मासिक पाळीचे आजार यावर मोफत उपचार सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येतील. पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांनी या योजनेस पात्र राहतील असे आयोजकांनी सांगितले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी संजय पोईलकर 8407978935 याच्यांशी संपर्क साधावा.

Exit mobile version