| पाली/बेणसे । वार्ताहर ।
नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी बेणसे ग्रामपंचायत सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवित असते. बेणसे ग्रामपंचायतीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन (दि.07) शुक्रवार रोजी सकाळी 10 ते 03 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. उध्दव कुथे बेणसे, यांच्या प्रयत्नाने व बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने व जेएसडब्लू संजिवनी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व जे एस डब्ल्यू सीएसआर फंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात पोटाचे विकार, आम्लपित, नेत्ररोग, संधिवात, आमवात, सांध्यांचे विकार, मणक्याचे विकार, मुत्राशयाचे विकार, किडणीचे विकार, हृदयरोग, श्वसनाचे विकार अशा आजारावर तपासणी करण्यात येणार आहे . तरी सर्वानी मोफत तपासणी करुन मोफत औषध उपचार व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन घ्यावे असे आवाहन बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आदींनी केले आहे.