पेंढाबे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शेकापचे अ‍ॅड. रत्नाकर पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।
खारेपाट विभागातील पेढांबे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य अ‍ॅड.रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेली 35 वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाने ताब्यात घेऊन निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. यावेळी सर्वच्या सर्व जागा जिंकून शेकापचे सता स्थापन केली होती. पेंढाबे ग्रामपंचायतच्या उपसरपंच स्मिता पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त उपसरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.12) निवडणूक घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच दिग्विजय पाटील यांनी उपसरपंचपदी अ‍ॅड.पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक, अविनाश आचरेकर, मंगल ठाकूर, ज्योती पाटील, नसीमा कुरेशी, अजित पाटील, श्रुती बैकर सचिन ठाकूर,नरेंद्र पाटील, सुधीर गोठणकर, लहू पाटील, आबास भाई, प्रवीण पाटील, कविता म्हात्रे, विजय सुर्वे, इसूब कुरेशी, प्रतिष पाटील, चिंतामण पाटील, जयेश बैकर, प्रसाद पाटील, यश पाटील, सुजल पाटील उपस्थित होते.

Exit mobile version