| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या केळवणे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा विनायक गावंड यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन केले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेला कामांचा अनुभव यापुढे ग्रामपंचायतीला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि विकासाची कामे यापुढे केळवणे ग्रामपंचायतमधील मार्गी लागतील, असे मत शेकाप कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, उपसभापती सुनील सोणावळे, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, भाई पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप नेते ज्ञानेश्वर मोरे व इतर शेकापचे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.