शिवशांती स्नेहालयातर्फे आरोग्य शिबीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, अलिबाग आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांच्या संयुक्त विद्यमाने भारती दीनानाथ तरे सभागृह श्रीबाग येथे रविवारी (दि.25) सकाळी 8 ते 1 या दरम्यान ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 60 ज्येष्ठ नागरिकांची डॉ. सुभाष म्हात्रे यांनी आरोग्य तपासणी केली.

या आरोग्य शिबिरात ‘अस्थी सांधे आरोग्य जागरुकता’ कार्यक्रमा अंतर्गत डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांनी अस्थीविकार टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. तर फिजीओथेरिपिष्ट डॉ. आदित्य तांबोळी, फिजीओथेरिपिस्ट डॉ. मनिषा मेश्राम, डॉ. क्षीतिजा वाईकर यांनी ज्येष्ठांकडून हातापायाचे, कमरेचे व मानेचे व्यायाम प्रकार करुन घेतले. तसेच, निरोगी राहण्यासाठी नियमित चालणे व काही व्यायामप्रकार करणे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी उपस्थित 60 ज्येष्ठ नागरिकांची शारिरीक तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच युरिक ऍसिड तपासणीसाठी सचिन यादव, आदित्य चापडे, बोन डेन्सीटी तपासणीसाठी साई जोशी, ऋषी कडवे, मनोज लोखंडे, डायबेटिक न्युरोपॅथी तपासणीसाठी अमित वालेकर यांची मोलाची मदत झाली.

Exit mobile version