। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि विरंगुळा केंद्र यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी 40 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करुन त्यांच्या त्वचेसंबधीच्या तक्रारींचे निराकरण केले. याप्रसंगी डॉ. सुभाष म्हात्रे यांनीही ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली. रविवारी (12 डिसेंबर) शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि आणि विरंगुळा केंद्रातर्फे माजी निवासी उपजिल्हाधिकारी स्व. दीनानाथ तरे यांच्या सुयोग निवासस्थानी भारती तरे सभागृहात, श्रीबाग येथे त्वचारोगांबाबत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम आणि आणि विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, उपाध्यक्ष डॉ. किरण नाबर, सचिव डॉ. प्रतिभा म्हात्रे, सहसचिव प्रफुल्ल राऊत, खजिनदार डॉ. जगदीश थळे, डी.डी. नाईक, डॉ. प्रशांत जन्नावार, अॅड. मनोज पडते, भारती तरे, चारुशीला कोरडे, शरद कोरडे, आर.के. घरत आदी उपस्थित होते. प्रारंभी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी त्वचेचे आजार याविषयी व्याख्यान दिले. त्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी 40 ज्येष्ठांच्या त्वचेची तपासणी करुन त्यावर उपचारही करण्यात आले. डॉ.सुभाष म्हात्रे यांनीही यावेळी ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली.