सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे आरोग्य शिबीर

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे पनवेल येथील स्पर्ष हॉस्पिटलमध्ये संघटनेच्या साठ सदस्यांची सपत्नीक तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्त सेवकांना वैद्यकीय तपासणी करुन मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी दूरवरून सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी वजन, उंची, शुगर, बी. पी., इसीजी, युरोफ्लोमेट्री इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. डॉ. सचिन नलावडे, डॉ. रोहित नलावडे, डॉ. सागर पाटील, स्वप्नील म्हात्रे तसेच हॉस्पिटलचे इतर डॉक्टर्स व स्टाफ यांनी याकामी खुप मेहनत घेऊन शिबीर यशस्वी केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेतर्फे अध्यक्ष यांनी सर्व डॉक्टर्सना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी संघटनेचे मार्गदर्शक अ. प्र. देशमुख, एस. एम. पाटील, उल्हास ठाकूर, बळवंत वालेकर, एस. एम. ठाकूर, बी.पी.म्हात्रे, अजय पाटील, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत नवगिरे, पी. डी. पाटील, प्रकाश खरसंबळे यांनी खुप मेहनत घेतली.

Exit mobile version