| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थितांना आवश्यक प्रोटीन औषधे देण्यात आली. डोळ्यांची सखोल तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. दैनंदिन ताणतणावाच्या कामात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकदेखील यावेळी उपस्थित होते. तसेच, पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलीस वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीर
