कृषीवलमध्ये आरोग्य शिबीर उत्साहात

। अलिबाग । प्रतिनिधी ।


जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द दैनिक कृषीवलच्या वतीने कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होतेे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.8) मार्च रोजी उत्साहात पार पडला. या शिबीराला कर्मचार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यावेळी कृषीवलच्या संपादक माधवी सावंत, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशीगंध आठवले, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. गणेश गवळी, डॉ. भूषण शेळके, प्रयास रुग्णालयाचे लॅब असिस्टंट योगेश सुर्यवंशी, विराज पाटील, हर्षदा सुर्यवंशी, पुजा पाटील, जुईली पाटील, कृषीवलच्या जाहीरात व्यवस्थापक हर्षा नाईक – पाटील, वित्त व लेखा विभाग प्रमुख दर्शना पाटील, संपादकीय विभागाचे वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, अविष्कार देसाई, सुयोग आंग्रे, वैभव पाटील यांच्यासह जाहीरात, वितरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. चांदोरकर आणि डॉ. आठवले यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद जाधव यांनी केले.

Exit mobile version