| अलिबाग | प्रतिनिधी |
परखड भूमिका मांडणारे, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी कायम उभे राहणारे, सर्वांच्या हक्काचे, रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक कृषीवलचा 89 वा वर्धापन दिन शनिवारी (दि.7) अलिबागमध्ये साजरा केला जाणार आहे.
शेतकऱ्यांचे नेते दिवंगत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप पुकारण्यात आला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी, कष्टकरी, कामगार व अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी नारायण नागू पाटील यांनी 7 जून 1937 मध्ये कृषीवल वृत्तपत्राची स्थापना केली. कृषीवलच्या माध्यमातून तळागाळातील घटकाला बातमीच्या रुपात न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत करण्यात आला आहे. कृषीवलचा 89 वा वर्धापन शनिवारी (दि.7) साजरा करण्यात येणार आहे. साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती कृषीवलच्या कार्यकारी संपादिका माधवी यांनी दिली आहे.