शेकाप नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिकेतील नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या वोढदिवसानिमित्त कळंबोली येथे कोकण शिक्षण विभागाचे आम. बाळाराम पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन दि.18मे रोजी करण्यात आले. या वेळी माथाडी नेते गुलाबराव जगताप नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेविका किरण दाभाने, नगरसेवक विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आम बाळाराम पाटील यांच्या हस्ते कळंबोली येथे विविध विकास कामा अंतर्गत हाय मास्ट चे उदघाटन, आदिवासी वाडीवरील जळकुंभ,गणेश घाटावर जॉगिंग ट्रॅक चे उदघाटन करण्यात आले तसेच आरोग्य शिबिरात रक्त तपासणी, महिलांचे आजार आदी वर उपचार करण्यात आले, याचा लाभ कळंबोतील नागरिकांनी घेतला. संध्याकाळी भव्य कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून कळंबोळीतील डॉक्टर्स, आशा वर्कर्स तसेच पनवेल महानगर पालिकेचे सफाई कामगार, विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवलेल्या विधार्थी, पालक आणि शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version