सरस्वती विद्यामंदिर वडघर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृती व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या दूर व्हाव्यात आजाराचे वेळीच निदान व्हावे याकरिता श्री प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि. 21) सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे येथे दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजता विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य शिबिरात मोफत तपासणी केली जाणार असून औषधोपचार देण्यात येणार आहेत. तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले असून पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी माणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर, श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सरस्वती विद्यामंदिर वडघर विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवृंद तसेच सरस्वती विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version