। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील उलवे नोड-2 पुरस्कृत आम्ही उलवेकर मित्र मंडळ तसेच जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने मोफत आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी (दि.19) सकाळी 11 ते 2 यावेळेत इनोव्हिजन आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर उलवे सेक्टर 8 व मेडिक्वेस्ट पॅथ प्रयोगशाळा उलवे सेक्टर 18 येथे होणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र चिकित्सा, कॅट्रॅक्ट सर्जरी चेकअप, डायबिटीस चेकअप व सल्ला, शुगर तपासणी, आरोग्य तपासणी व वजन कमी करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन मोफत करण्यात येणार आहे. तसेच माफक दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा जास्ती-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.