| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे गाव ग्रामपंचायतीत मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाणेच्या वतीने व ओम हेल्थ केअर सेंटर कामोठे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तपासणी शिबिरामध्ये बीपी, शुगर, प्रोटिन्स टेस्ट, इत्यादी आजारांबाबत तपासणी करण्यात आली. सदर शिबिरात एकूण 22 मच्छिमार बांधव व कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता.







