आरोग्य तपासणी व पोषक आहाराचे वाटप

| रोहा । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील विविध प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व पोषक आहाराचे वाटप सुतारवाडी दि रोटरी क्लब ऑफ वरळी-मुंबई, रोटरी क्लब ऑफ लालबाग-मुंबई आणि डेमिसल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यातील कांदळे, चिंचवली तर्फे अतोणे, विठ्ठलवाडी तसेच खरबाचीवाडी वस्ती या रायगड जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष आकांक्षा बेक्टर, योगेश गुप्ता, सचिन सिंधवी, कविता चांदेकर, दीप्ती तसेच डेसिमल फाउंडेशनच्या ट्रस्टी नीलम जेठमलाणी, डॉ. अभिषेक, डॉ. ध्रुव, जपानचे डॉ. युता, येरळ केंद्राचे केंद्रप्रमुख भागवत भुसारे, याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते. यावेळी योगेश गुप्ता यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून या शाळांना डिजिटल बोर्ड, संगणक, प्रिंटर व पंखे आम्ही पुरवू. पुन्हा सहा महिन्यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक या ठिकाणी येईल आणि सर्व मुलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version