अलिबाग | वार्ताहर |
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र तसेच शिवजयंती मंडळ व ग्रामस्थ मंडळ महान यांच्या संयुक्त विद्यमाने महान गावात समाज मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली. यावेळी डॉ. राजाराम हुलवान, डॉ. प्रज्योत पाटील, सतीश कणसे, भूषण जंजिरकर, संजय काळेल, शिवतेज कणसे हे माणुसकी टीम कडून उपस्थित होते. शिबिरामध्ये 70 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. डॉ. राजाराम हुलवान यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले.







