जेएसडब्ल्यूतर्फे अंगणवाडीतील मुलांची आरोग्य तपासणी

| कुसुंबळे | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोलवी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुका कुपोषणमुक्ती अभियानाअंतर्गत संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे सीएसआरच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली.

यावेळी ळ 43 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जन्मापासून विकलांग, उंची व वयानुसार कमी वजनाची मुले व कमी उंचीची मुले, सतत आजारी असल्याने वजन न वाढणारी मुले, इत्यादींची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. विशेष म्हणजे जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलमधून तीन महिन्यांची मोफत औषधे मुलांना दिली तर त्यानंतरही प्रत्येक मुलाच्या आरोग्याबाबत व सुधारणाबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जेएसडब्ल्यू सीएसआर प्रमुख सुधीर तेलंगे यांनी यावेळी सांगितले. बालविकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांनी यावेळी जेएसडब्ल्यू सीएसआर विभागाने केलेल्या सोयीबद्दल आभार व्यक्त केले.

संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता डॉ.अभयचल झा, आरोग्य कार्यक्रम प्रमुख संतोष राऊत पाटील, आरोग्य कार्यक्रम समन्वयक दिपाली म्हात्रे, कम्युनिटी ऑर्गनायझर संगीता टेमकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सामिया पेरेकर, भाग्यश्री पाटील, कल्पिता साळगावकर व समस्त अंगणवाडी सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version