विद्यालयातील मुलींची आरोग्य तपासणी

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील नांदगाव-यशवंतनगरच्या श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील मुलींची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जस्मीन मनसे, काशिनाथ कुलकर्णी, आरोग्य पथक नांदगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया मंगेश पाटील, आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, सुभाष हुरदुके, प्रणय धसाडे, आरोग्य सेविका प्रज्ञा चौलकर, लॅब टेक्निशियन साक्षी गुरव, स्नेहा वीरकर, सुमित वाडकर, मळेकर आदींनी मुलींची एच.बी. हिमोग्लोबीन व अन्य तपासण्या केल्या.

यावेळी मुलींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून, व्यायामाचे महत्त्व, फास्ट फूडचे सेवन न करणे, पाळीच्या वेळी घ्यावयाची स्वच्छता व काळजी, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर करणे आदींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या समस्यांबाबत डॉक्टरांना न लाजता, न घाबरता सांगून त्यांची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ए.यू. खोत यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version