पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

माधवबाग आयुर्वेदीक रूग्णालयाचा पुढाकार


| खोपोली | प्रतिनिधी |

पत्रकार दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी गोरगरीबांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. वेळेवर आहार, विहार न केल्यामुळे अनेक व्याधीने ग्रासले जातात. यादरम्यान वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागले आहे. कुटुंब आर्थिक संकटाला समोरे जात आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेत माधवबाग या आयुर्वेदीक रूग्णालयाच्या आरोग्यम हृदयसंपदा उपक्रमांतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी या तपासणी शिबिरात भाग घेतला. यावेळी माधवबाग हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुशांत पिसाळ, डॉ.तेजश्री यादव, अरुण यादव,राहुल बी, रवी, डॉ. स्नेहल डोंगरे, आर.ओ.सचिन कदम पंचकर्म विभाग निलेश ,मेडिकल विभाग सुनील ,धनंजय यासह स्नेहल व तृप्ती व सहकारी स्वच्छता विभाग तानाजी तेजु यासह अन्य माधवबाग टीमने पत्रकारांच्या शिबिरासाठी मेहनत घेतली.

यावेळी प्रेस क्लबचे रायगड जिल्हाध्यक्ष भारत रांजणकर, सचिव शशिकांत मोरे, सल्लागार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, प्रवीण जाधब, अनिल पाटील, एस टी पाटील, रवींद्र मोरे, समाधान दिसले, संतोषी म्हात्रे, सहकारी पत्रकार बाबू पोटे,अरुण नलावडे, जयवंत माडपे, संदीप ओव्हाळ, शेखर जांभळे, अर्जुन कदम, सारिका सावंत, विलास श्रीखंडे सह अन्य पत्रकारांनी माधवबाग आयुर्वेदिक रूग्णालयाच्या व्यवस्थापक रोझी भानुशाली यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version