पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर लायन्स क्लब यांच्यावतीने आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि नायर हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने खालापूर तालुक्यातील पोलिसांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर शारीरिक तपासणी देखील झाली.

डोळ्यांमुळेच आपण आपला परिसर पाहू शकतो आणि अनुभवू शकतो. तथापि, कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांच्या विकारामुळे मोठी गैरसोय होऊ शकते. यासाठी आपण आपल्या डोळ्यांची व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे, असे खालापूर लायन शिवानी संतोष जंगम यांनी सांगितले. पोलीस हे चोवीस तास कार्यरत असतात. रात्रंदिवस ते काम करीत असल्याने त्यांच्यात डोळ्यांचे विकार वाढत चालले आहेत. त्यामुळे एखाद्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच डोळ्यांच्या स्थितीचे लवकर निदान होण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे, तसे न झाल्यास डोळ्यांची कायमची स्थिती किंवा अंधत्वदेखील येऊ शकते, असे लायन्स क्लबचे खजिनदार किशोर पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, सपोनि. पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि गाव पोलीस पाटील, दिव्यांग यांची नेत्र तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शिवानी जंगम, लहू भोईर प्रथम उपाध्यक्ष, किशोर पाटील खजिनदार, भरत पाटील उपाध्यक्ष 2, लायन सभासद हरिभाऊ जाधव, कांचन जाधव, महेंद्र सावंत, अशोक पाटील, विक्रांत साबळे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे-पाटील यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version