वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडून विहिरीची स्वच्छता
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत वडगाव हद्दितील असलेली तळवली दांडवाडी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा हा विहिरीतून पाईपलाईनद्वारे होत आहे. मात्र, पावसाळ्यात या विहिरीचे पाणी गढूळ झाल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी खोदकाम होत असल्यामुळे येथील पाण्यावर परिणाम झाला आहे. ही वाडी उंच ठिकाणी असल्यामुळे या बांधवाना हे पाणी नळाद्वारे पोहचविण्यात येते. मात्र विहिरीतच पाणी दिवसेंदिवस खराब होत असल्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजीचा सुर उमठत आहे. मात्र ग्रुप ग्रामपंचायतीने वडगाव यांनी दखल घेत स्वच्छता मोहीम राबविली.
ही विहीर दांडवाडीपासून जवळजवळ 600 मिटर अंतर खाली आहे. तर येथील ग्रामस्थ उंच टेकडीवर राहततात. दूषित पाण्यासमवेत या विहिरीमध्ये झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मात्र ही साफ करण्यासाठी याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणी गढूळ होत असल्यामुळे काही ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहे. मात्र, प्रत्येकाची स्थिती उत्तम आहे असे नाही. यामुळे विहिरीची स्वच्छता करुन हे पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
पाणी म्हणजे आपले जीवन आहे. मात्र गेल्या काही वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या विहिरीची दुरावस्था निर्माण झाली आहे. आजही अनेक विहिरीत पाणी आहे. मात्र त्या पडीक असल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वीपासून या तळवळी दांडवाडीतील ग्रामस्थ याच विहिरीचे पाणी पित होते. मात्र दिवसेंदिवस औद्योगिकरणांचे जाळे तयार होत असताना साहजिकच यांचा परिणाम या विहिरीवर झाला आहे.
तळवली दांडवाडी येथील विहिरीचे पाणी गढूळ झाल्याचे निदर्शनास येताच विहिरीची स्वच्छता करण्यात आली. तर या ठिकाणी हे पाणी विहिरीत पाझरु नये, यासाठी नाला काढण्यात आला आहे. तसेच पाणी शुद्धतेची बॉटल वाटप करण्यात आली आहे.
सुहास वारे, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव – प्रशासक
दांडवाडी येथील अदिवासी बांधवाना पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे. या ठिकाणी होत असलेल्या खोदकामामुळे विहिरीचे पाणी गढूळ झाले असल्याचे समजते.
– अतुल मालकर, सामाजिक कार्यकर्ते, तळवली






