पनवेल इनरव्हीलतर्फे मूकबधीर मुलांची आरोग्य तपासणी

। पनवेल । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने इनरव्हील क्लब, पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्यावतीने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन संचालित मूक बधीर विद्यालय, नवीन पनवेल येथील मुलांसाठी दंत चिकित्सा व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शाळेतील 43 मुलांची तपासणी करण्यात आली. डॉ. जयश्री पाटील व डॉ. अर्चना केसकर यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरास शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बनसोडे व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.

हिमोग्लोबिन कमी असलेल्या मुलांना औषधे व दंत विषयक आजारावर उपचार व सल्ला देण्यात आला. या शिबिराचे नियोजन इनरव्हील क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाउनच्या अध्यक्षा कल्पना नागावकर व सचिव सई पालवणकर तसेच डॉ. राजश्री बागडे व सोनाली परमार यांनी केले.

Exit mobile version