फिरत्या दवाखान्याद्वारे आरोग्य तपासणी

। पेण । वार्ताहर ।
अतिवृष्टीमुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत गढूळ झाले असून जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आदेश जारी केले असले तरी खासगी तसेच सरकारी दवाखान्यात गर्दी वाढली आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशनमार्फत रुग्णसेवेकरिता फिरत्या दवाखान्याचे आयोजन केले आहे.

पेणमधील आदिवासी पट्ट्यात मोफत आरोग्य तपासणीबरोबरच जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आदिवासी महिलांमध्ये हिमोग्लोबीन, कॅल्शियमची कमतरता, कुपोषणामुळे प्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे कुठलाही आजार झाल्यास तो लवकर बळावत असल्याचे डॉ. मैत्रेयी पाटील यांनी सांगितले. आरोग्य तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यासाठी आदिवासी समाजातील तरुणींना दरमहा प्रशिक्षण देण्यात येत आहे. पेण तालुक्यातील एकूण 40 आदिवासी वाड्यांमध्ये अभियान राबविण्यात येणार असल्याचे अंकुर ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version