अग्निपथ योजनेविरोधातील सुनावणी स्थगित

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अग्निपथ योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं सर्व याचिका एकत्र करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठानं केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंडच्या उच्च न्यायालयांना या योजनेच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करा, असं सांगितलंय. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत निर्णय स्थगित ठेवण्यास सांगितलंय.

Exit mobile version